लाडकी बहिन योजना ही गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीनच योजना आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेचा लाभ |
पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये वर्षाला १८००० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात देण्यात येईल. |
Important Dates
अर्ज भरण्यास सुरूवात >> | १ जुलै २०२४ |
अंतिम तारीख >> | निरंतर चालू राहील |
पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- कमीत कमी वय २१ वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/– किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- बँक पासबुक
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे (पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे राशनकार्ड / मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
- अर्जदाराचा फोटो
अर्ज प्रक्रिया
Online >>
- लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज Nari Shakti Doot या अँप वर आणि ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल वर करता येईल.
Offline >>
- ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांनी अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका / मुख्यसेविका / सेतु सुविधा केंद्र / ग्रामसेवक / समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका / वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
Note – अर्ज भरत असतांना अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
Installment Dates
Installment | Date |
1st Installment ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 |
2nd Installment | (अपेक्षित) सप्टेंबर 2024 |
Note –
- ज्यांनी ३१ जुलै पर्यंत फॉर्म भरले आणि ज्यांचे फॉर्म Approved झाले त्यांना पहिला हफ्ता मिळाला आहे.
- ज्यांना अजून पहिला हफ्ता मिळाला नाही त्यांना एकाच वेळी ४,५०० रुपये सप्टेंबर मध्ये मिळतील.
Helpline Number
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र 3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत |
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ |